Tuesday 8 December 2015

काही न पाठवलेली पत्रे

प्रिय,

खरं तर हा शब्द आता वापरायचा की नाही हे मला माहित नाही. कारण मी तुझ्या साठी जुनाच 'तो' असेल का माहीत नाही, तरी पण 'प्रिय'.
आता तू कदाचित म्हणशील फोन, व्हॉट्सऍप, एसएम्एस च्या जमान्यात हा पत्र प्रपंच कशासाठी ??? पण पत्रातून जे काही बोलता येतं ते इतर कशातून नाहीच जमत. खरं तर खुप आधीच हे पाठवायच होतं, गेल्या कित्येक दिवसांपासून मनात साठवून ठेवलेलं बोलायचं होतं पण हिम्मत करून लिहितोय. आपली भांडण ही तुला आणि मला काही नविन नव्हती, पण त्यादिवशीचा नूर काही वेगळाच होता. माझ्या नकळत माझा स्वाभिमान दुखावल्या गेल्याने मी तुला भरपूर बोललो ही. असं म्हणतात 'जो बूँद से गई वो हौद से नहीं आती' तरी पण सॉरी.  आपण दोघांनिही सांभाळून घ्यायला हवं होत पण नाहीच जमलं ते आणि शब्दाला शब्द वाढत गेला.  पण मी काय म्हणतो झालं गेलं विसरून जाऊन करुया ना नवी सुरवात 'मरीन ड्राइव्ह' च्या सूर्यास्ताच्या साक्षीने...
करशील ना एवढं आपल्यासाठी  ????

(तुझाच) मित्र

Tuesday 1 December 2015

बुजगावणे

पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा
स्वप्नांवर होता ताबा चांदण्यांचा

पाखरे अशी येतात कुठून येथे
साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा

जरा मोकळे श्वास घेऊ आधी
मग सोडवू प्रश्न अर्भकांचा

काल पर्यंत होते सारे षंढ इथे
आज होतो एल्गार स्वरांचा

जगतानाच त्यांनी जाळले मला इथे
मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा

#जिप्सी