Tuesday 26 May 2015

बॅचलर

कधी कधी ही कातरवेळ ज़रा जास्तच खायला उठते , त्यातल्या त्यात जर तुम्ही घरापासून दूर 'बॅचलर' म्हणून रहात असाल तर परिस्थिती अजुन बिकट. हातातुन काहीतरी सुटत चालल्याची भावना अजुन तिव्र होते. दिवसभर काम करून तुम्ही थकुन घरी येता रूमचा दरवाजा उघड़ता या आशेने की आज तरी काही चमत्कार होईल , पण कशाच काय नुसत्या बोलण्याने थोड़ी काही बदलते.
तीच रूम,तोच भक्क उजेड फ़ेकणारा CFL तेच सगळ काही.
गलितगात्र झालेला जीव कॉफी बनवायला किचन मधे जातो तिथे दिसते की ओटयावर कालरात्रीचा पसारा तसाच पडलेला आहे आणि लख्ख्कन तुम्हाला 'आई' सोबत नसल्याची बोचरी जाणीव होते. कॉफी घेऊन तुम्ही बाल्कनी मधे जाता तर समोरच्या बाल्कनी मधे एक 'आजी' उगाचाच त्या मारून- मुटकुन जगवलेल्या तुळशीसमोर दिवाबत्ती करत 'शुभंकरोती' म्हणत असते आणी घर सोडल्यानंतर आपण कधीही 'शुभंकरोती' म्हटल नसल्याच तुम्हाला उगाच आठवुन जात.

काही संध्याकाळ उगाच अस्वस्थ करतात.

‪#‎बॅचलर्स_डायरी‬


Monday 18 May 2015

गुलाल

जरी देवळात उडवला मी गुलाल काल काही
तरी पायरीत आज भेटले दलाल काही

मदिरेतच झिंगतात लोक असे नाही
देवळातही होतात हलाल काही

उगाच वाहतो का ओझे फुकाचे
जीवना मी तुझा हमाल नाही

का विझावे पणती परी
अजूनही पेटवु मशाल काही

#Gypsy