Thursday 30 April 2015

कपाट

कपाट

तु, गझल, लवलेटर, सही
डांबरगोळी, कवितेची वही
RS खंबा, रिकामा ग्लास
जपलेले मोरपिस, रूम भकास
पाळलेले ढेकुण, बाकी चुकलेले एकुण
विजेच् बिल, तुटलेल दिल.....
Condom च पाकिट, तुझ जाकिट… 
#Gypsy

Wednesday 29 April 2015

प्रिय गुलझार,

प्रिय गुलझार,
समजायला लागल तेव्हा तु जी 'माचिस' पेटवलीस
ती आजतागयात चालूच आहे.
'आसमा के पार शायद और कोई आसमा होगा' अस
म्हणत जेव्हा स्वप्न पुरी करण्या साठी पुण्यात
आलो तेव्हा सुद्धा तू सोबत होतास.
 घर सोडल्यावर "छोड आये हम वो गलीया" च महत्व जाणवल तेच तू
सोबत होता.
रात्री बेरात्री जेव्हा पुण्यात 'एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढता है,
आशियाना ढूँढता है' म्हणत घरोंदा शोधत भटकत होतो तेव्हा तू सोबत होता.
'सपने मे मिलती है' अस म्हणत फक्त स्वप्नात मिळणारी कुडी जेव्हा प्रत्यक्षात भेटली,
तेव्हा 'पहली बार मोहब्बत कि है' असा म्हणत
दोघात एक ICE -cream खाताना तुझी सोबत होती.
'हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए खुले आम आँचल
ना लहरा के चलिए ' अस म्हणत तिचे मानेवर मागे
रुळणारे कुंतल रेशमी केस सांभाळत F C road वर तिच्या सोबत भटकताना तू होतास.
'अजून सुद्धा ऐ जिंदगी गले लगा ले
हम ने भी तेरे हर एक ग़म को गले से लगाया हैं', म्हणत
आयुष्यासोबत जेव्हा उभा दावा मांडत
असतो तेव्हा तुझी सोबत असते अनंत
काळच्या मित्रासारखी
एखाद्या उदास संध्याकाळी 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' PC वर चालू
असताना एकटेपणात सुद्धा तू कुठेतरी लपलेला असतोस.
यु तो गुनगुनाता हु हर शाम तेरी नज्मे
तेरे होनेसे हि ये जिंदगी 'गुलझार' है....


#Gypsy

Tuesday 28 April 2015

बाजीराव पेशवा - मराठेशाहीच सुवर्णपान

महाराष्ट्राच्या इतिहासात
महाराजसाहेब आणि शंभुराजे यांच्यानंतर जर एखाद्या पराक्रमी आणि बुद्धिनेही तितक्याच् हुशार अश्या सेनापतीच नाव घ्यायच झाल्यास तर ते बाजीरावांच घ्यावे लागेल. मोगल, निजाम, हैदर, सिद्दी,पोर्तुगीज आणि इंग्रज यांसारख्या शत्रुना मात देत महाराजसाहेबांच स्वप्न बहुतांशी पूर्ण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांच्यासारखा अजिंक्य योद्धा निराळाच.
वयाच्या केवळ १९व्या वर्षी मिळालेल पेशवेपद, उण्यापुर्या 40 वर्षाच्या आयुष्यात बत्तीस लढाया खेळून त्यातली एकही लढाई न हरलेला बाजीराव हा अजिंक्य आणि एकमेवाद्वितीय असाच आहे.
बाजीरावांनी खेळलेल्या लढ़ायांमधे त्यांचे युद्ध कौशल्या खासा दिसुन येते, मराठ्यांचे प्रमुख अस्त्र असलेला 'गनिमी कावा' आणि जलद हालचाली याचा वापर त्यांनी अगदी पुरेपूर करून घेतला. शत्रुला पेशवे नेमके कुठे आहे हे समजत नसे इतक्या त्यांच्या हालचाली वेगवान होत्या. जगप्रसिद्ध अशी 'पालखेडची लढाई' हे सर्वोत्तम उदाहरण.
शिवछत्रपतींचा 'पहिले ते सावधपण दूसरे ते राजकारण' हा मंत्र अगदी प्राणप्राणाने जपला होता. कोल्हापुर आणि सातारा गादीमधे विस्तवही जात नसताना दोन्ही बाजूस सांभाळून घेऊन राजकारण करीत स्वराज्य वाढीस नेण्याचे काम बाजीरावांनी लीलया केले. याकामी त्यांना साथ लाभली ती मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे यांच्यासारख्या शुर सरदारांची. या सगळ्या गोष्टी बाजीरावांच्या अनेक पैलुंचे दर्शन घडवितात.
बाजीराव जितके शुर होते तितकेच रसीक मनाचे सुद्धा होते, प्रेम का कराव आणि कराव याच
बाजीराव- मस्तानी हे सर्वोत्तम उदाहरण, दुर्दैवाने आम्ही फक्त त्यांच्याबद्दल अजुनही गैरसमज पसरवण्यातच धन्यता मानतो. आयुष्यभर क्षत्रियजीवन जगणाऱ्या या योध्याला चिरविश्रांती लाभली २८ एप्रिल १७४० नर्मदेकाठी 'रावेरखेड़ी'
अशा या शुर योध्याच्या कुडीतून प्राण जावा ते पण मोहिमेवर असतानाच याउपर त्यांचे थोर भाग्य ते कुठले.

अशा या रणमर्द पेशव्याला त्रिवार मुजरा.

‪#‎पेशवा‬
‪#‎gypsy‬


Wednesday 15 April 2015

गझल सूर्य


काही माणसे खरच कालातीत असतात, ती या जगात नसली तरी काही रुपाने ती कायम आपल्यालासोबत करतात.
सुरेश भट हे नाव त्यापैकीच एक. कळत्या वयातल्या माझ्या कित्येक रात्री तुमच्या   गाण्याची आवर्तने करण्यात सरल्या आहेत. मग ते 'केव्हा तरी पहाटे' असो अथवा
'मेंदीच्या पानावर' शब्दांच्या या जादुगराने खुप मोहवले आहे. 'सुन्या सुन्या मैफिलित माझ्या तुझेच मी गात आहे' या गाण्याची मोहिनी तर आयुष्यभर कायम राहणार, कारण या गाण्यानेच एक नाजुक अशी जखम दिली आहे.
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
असे म्हणून जगन्याच तत्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात मांडणाऱ्या 'सुरेश भट' नावाच्या बाप माणसाचा आज वाढदिवस.


Wednesday 1 April 2015

शायर

शायर 


तसा तो लिहित नाहीच हल्ली
पण हुक्की आली की बसतो कागद पेन घेऊन खिड़कित तासनतास

मग घरातून बाहेर पड़ताना पांढराशुभ्र झब्बा घालतो,
सोबतिला तीच फ्रेंच कट दाढ़ी तिला आवडायची म्हणून.
पायात paragon ची पावसाळी चप्पल (पाऊस त्याच्या आयुष्यतुन कधीचाच निघुन गेलाय तरी)
येतो चक्कर मारून 'मरीन ड्राइवहुन'
जुन्या आठवणी वेचत वेचत ज्या
' sea link'वरून फेकल्या होत्या कधीतरी निर्माल्यासारख्या....

तसा तो लिहित नाहीच हल्ली
पण लोक आजही त्याला 'शायर' म्हणूनच ओळखतात.....

#Gypsy

बंजारा

यु तो हम इश्क़ तुझसे भे करते है,
पर  बंजारेपन से थोडी ज्यादा मोहब्बत है । 

#Gypsy