Tuesday, 8 December 2015

काही न पाठवलेली पत्रे

प्रिय,

खरं तर हा शब्द आता वापरायचा की नाही हे मला माहित नाही. कारण मी तुझ्या साठी जुनाच 'तो' असेल का माहीत नाही, तरी पण 'प्रिय'.
आता तू कदाचित म्हणशील फोन, व्हॉट्सऍप, एसएम्एस च्या जमान्यात हा पत्र प्रपंच कशासाठी ??? पण पत्रातून जे काही बोलता येतं ते इतर कशातून नाहीच जमत. खरं तर खुप आधीच हे पाठवायच होतं, गेल्या कित्येक दिवसांपासून मनात साठवून ठेवलेलं बोलायचं होतं पण हिम्मत करून लिहितोय. आपली भांडण ही तुला आणि मला काही नविन नव्हती, पण त्यादिवशीचा नूर काही वेगळाच होता. माझ्या नकळत माझा स्वाभिमान दुखावल्या गेल्याने मी तुला भरपूर बोललो ही. असं म्हणतात 'जो बूँद से गई वो हौद से नहीं आती' तरी पण सॉरी.  आपण दोघांनिही सांभाळून घ्यायला हवं होत पण नाहीच जमलं ते आणि शब्दाला शब्द वाढत गेला.  पण मी काय म्हणतो झालं गेलं विसरून जाऊन करुया ना नवी सुरवात 'मरीन ड्राइव्ह' च्या सूर्यास्ताच्या साक्षीने...
करशील ना एवढं आपल्यासाठी  ????

(तुझाच) मित्र

Tuesday, 1 December 2015

बुजगावणे

पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा
स्वप्नांवर होता ताबा चांदण्यांचा

पाखरे अशी येतात कुठून येथे
साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा

जरा मोकळे श्वास घेऊ आधी
मग सोडवू प्रश्न अर्भकांचा

काल पर्यंत होते सारे षंढ इथे
आज होतो एल्गार स्वरांचा

जगतानाच त्यांनी जाळले मला इथे
मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा

#जिप्सी

Saturday, 21 November 2015

That is you

I am jealous of your heart
Which is always with you,
But not me.....

I am jealous of your dreams,
In which you roam around all over the world .....

I am jealous of that seawaves ,
that touches you daily....

But surely I m not jealous of one thing.

That is you, that is you.....


#Gypsy

Saturday, 31 October 2015

संकष्टी

आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी,
तू कशी दिसत होतीस गं ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???

DDLJ मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही...

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा.

आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो,
आणि
माझा 'संकष्टी चतुर्थी' चा.


जिप्सी

Monday, 26 October 2015

Human Being

1st they called me 'Christian' & set me into the fire,
Then they called me as a 'Hindu' & killed me in godhra
&
Now they referred me as a 'Muslim' & lynched me in dadri.
somewhere they forgot that "I" am just a human being.



Gypsy

Sunday, 11 October 2015

धर्म संकट में

सच बोलूँ यहाँ हर कोई बेईमान है,
धरम तेरा कौनसा ईमान है ?

मंदिर-मस्जिद के दंगों में बटे है सारे,
जिंदा बचे हुए कुछ इंसान है !

तू कौनसी कश्मकश में हैं ए जिंदगी ?
हर कोई यहाँ हैरान है !

जिंदगी की कीमत क्या लगाते हो बाबू,
मरना तो यहाँ बहौत आसान है !

टूटते हुए इन शीशों के साथ,
एक टुटी हुई उड़ान है !!

जिप्सी

Thursday, 8 October 2015

कल चौदवी की रात थी

मुहब्बत करने वालों में ये झगड़ा डाल देती है,
 सियासत दोस्ती की जड़ में मट्ठा डाल देती है

प्रिय गुलाम अली साहेब
कसय माहितै का  आमच्या प्रमुखांना मनापासून तुमची गझल आवडते, पण काय आहे ना तुम्ही पाकिस्तानचे आहेत म्हणुन विरोध आहे. संगीत से बैर नहीं, हरे से परहेज है साहब बाकी काही नाही.
संगीत पाकिस्तानी किंवा हिंदुस्तानी कसं असू शकतं फक्त संगीतच काय कोणत्याही कलेला सिमेच बंधन नसावच मुळी.
लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है
मैं उर्दू गझल कहता हूँ और हिंदी मुस्कुराती है

मुन्नवर राणांचा हा शेर तुम्हाला अगदी फिटट बसतो, तुमचा मुक्काम जरी पाकिस्तानात असला तरी अगदी आमच्या 'गझल नवाज' भीमराव पांचाळें सारखेच सच्चे वाटता. सध्या काय आमची लोक बरयापैकी भैसाटली असल्या कारणाने अगदी झुंडीत विरोध कराताएत और झुंड का कोई मजहब नहीं होता. 
बदन में दौड़ता सारा लहू ईमान वाला है
मगर ज़ालिम समझता है की पाकिस्तान वाला है

पण एक आहे मुन्नवर राणांचा हां शेर तुमच्या बाबतीत अगदी खरा ठरलाय.

खैर सध्या तरी.
कल चौदवी की रात थी शब् भर रहा चर्चा तेरा
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहाँ चेहरा तेरा
ऐकत फोन मधुनच भेटतो.....