ढगच दाटतात आकाशात सध्या
नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली
नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली
जगणे सुद्धा कठीण झाले सध्या
पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली
पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली
जरी बाप राबतो शिवारात त्याचा
शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली
शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली
पाहू कोण पुरुन उरतो सध्या
मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली
मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली
सारे नेतेच उदंड झाले सध्या
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली
जिप्सी
No comments:
Post a Comment